पहिली हायड्रोजन बस लडाखमध्ये

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी बस सेवा केंद्रशासित प्रदेश लडाखच्या रस्त्यांवर लवकरच सुरु करण्यात येणार आहे. भविष्यातील तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली ही बससेवा लेहमध्ये सार्वजनिक रस्त्यांवर व्यावसायिक चाचण्यांसह सुरू करण्यात येणार आहे. भारतातील सर्वात मोठी वीज उत्पादक कंपनी या प्रकल्पांतर्गत शहरातील आंतर-शहर सेवेसाठी लेह प्रशासनाला पाच हायड्रोजन इंधन सेल बसेस पुरवणार आहे. सरकारी कंपनीने बसेसला इंधन देण्यासाठी ग्रीन हायड्रोजन तयार करण्यासाठी इंधन केंद्र आणि 1.7 मेगावॅटचा सोलर प्लांटदेखील बांधला आहे. यासाठी लेह प्रशासनाने पायाभूत सुविधांसाठी शहरातील 7.5 एकर जमीन भाड्याने दिली आहे.

Exit mobile version