आदेश खेडकर जिल्ह्यात प्रथम

। खरोशी । प्रतिनिधी ।

पेण येथील सुमतीबाई देव प्राथमिक विद्यालयाचा इयत्ता पाचवीमध्ये शिकणाऱा विद्यार्थी आदेश अंबादास खेडकर याने मंथन परीक्षेमध्येरायगड जिल्ह्यामध्ये प्रथम येण्याचा मान पटकावला. तो कोकण विभागात दुसरा तर राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये सहावा आला आहे.

हुशार व अभ्यासूवृत्तीच्या आदेशने इतरही स्पर्धा परीक्षांमध्ये सुयश संपादन केले आहे. तो गणित संबोध परीक्षेमध्ये जिल्ह्यात प्रथम, गणित प्राविण्य परीक्षेमध्ये रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याची जवाहर नवोदय परीक्षेमध्ये सुद्धा निवड झाली आहे. आदेशचे आई वडील प्राथमिक शिक्षक असून आदेशच्या या यशामागे त्यांचा महत्वाचा वाटा आहे. आदेशने मिळवलेल्या या यशाबद्दल पेण पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी अरुणादेवी मोरे, केंद्रप्रमुख रामकृष्ण भोईर, व शाळेचे संचालक मंडळ यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

Exit mobile version