शिष्यवृत्ती परीक्षेत आर्या म्हात्रे जिल्ह्यात प्रथम

। अलिबाग । वार्ताहर ।
आरसीएफ शाळेची इयत्ता आठवीची विद्यार्थिनी आर्या हरिश्‍चंद्र म्हात्रे हिने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत 72.48 टक्के गुण मिळवून रायगड जिल्ह्यात ग्रामीण सर्वसाधारण यादीत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. ही परीक्षा 12 ऑगस्ट 2021 रोजी झाली होती. या परीक्षेचा अंतिम निकाल दि. 8 जानेवारी रोजी जाहीर करण्यात आला. आर्या म्हात्रे हिच्या यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Exit mobile version