। रेवदंडा । प्रतिनिधी ।
26 वी राज्यस्तरीय शितोरूयू चॅपियनशीप कराटे स्पर्धा अलिबाग येथील होरेझॉन हॉल येथे संपन्न झाली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्हातील कराटे स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत रायगड जिल्हा कराटे असो. रेवदंडाने उल्लेखनिय यश संपादन करून 22 सुवर्णपदक, 24 रौप्यपदक व 40 कांस्यपदकांसह एकूण 87 पदकांची कमाई केली आहे. या स्पर्धेत कराटे स्पर्धक गायत्री चुनेकर, स्वरा जाधव, इश्वरी घरत, इश्वरी नाईक, आर्या विचारे यांना बेस्ट फायटर म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.
या स्पर्धेत रायगड जिल्हा कराटे असोसिएशन रेवदंडाचे सुवर्ण पदकाच्या मानकरी गायत्री चुनेकर, स्वरा जाधव, ईश्वरी घरत, ईश्वरी नाईक, आर्या विचारे, सृष्टी सावंत, सिंध्दी मुंगळे, खुशी चाळके, धनश्री सकपाल, सानिका ठाकूर, भक्ती म्हात्रे, भक्ती जमादार, संस्कृती म्हात्रे, साई घरत, प्राची ठाकूर, अनया पाटील, मृदला पाटील, तनुश्री हवालदार, रौप्य पदकाच्या मानकरी जिवीता गोवर्धने, कृतिका म्हात्रे, भार्गवी वर्तक, डिमंका मॅडिॄक, सृष्टी सावंत, श्रुती सातमकर, सिध्दी मुंगळे, आरोही गोवर्धने, अर्पिता डिके, ओवी घरत, ईश्वरी जमादार, भक्ती जमादार, दुर्वा उमटे, शर्वरी ढोलके, अलिजा मुकरी, तंजीला मुकरी, मृदृला पाटील, तसेच कांस्यपदकाच्या मानकरी निधी मोरे, रिध्दी जाईलकर, आर्या पाटील, स्वरूपा पाटील, कनिष्ठा घरत, आर्या मिसाळ, शुभ्रा सातमकर, रूद्धा म्हात्रे, खुशी चालके, धनश्री सकपाल, मानसी काटकर, प्रेक्षा पाटील, समृध्दी पाटील, तनुश्री हवालदार, नेहा घाग, स्फुर्ती पोसणे, आर्पिता डिंके, संस्कृती माने, पुर्वी जयस्वाल, दिव्यांशी गाडे, स्वरूपा गावंड, मानसी जयस्वाल, सलिला मुकरी,आर्या विश्वकर्मा, दिक्षा तांबडकर, श्रीशा आग्रावकर, ईश्वरी जमादार, भक्ती म्हात्रे, दुर्वा उमटे, प्राची ठाकूर या ठरल्या आहेत.