| कर्जत | वार्ताहर |
कर्जत एस.टी. आगारात बुधवारी (दि.22) रात्री 10 वाजता एका शिकाऊ चालकाने गायीला चिरडल्याची घटना घडली आहे. या गायीच्या पोटात वासरू होते. बस स्थानकाच्या आवारात गाय बसली होती, तेव्हा आलेल्या या बसने तिला चिरडले. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. भीसेगाव येथील ग्रामस्थांनी एस.टी. आगाराच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. सदर प्रकरणी ग्रामस्थांनी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, शिकाऊ चालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. गाभण गायीसह तिच्या पोटातील वासराच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.