। मुंबई । प्रतिनिधी ।
रोहित शर्माचा खेळ पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या चाहत्यांना पुन्हा एकदा निराश व्हावे लागले आहे. 2015 नंतर रणजी करंडक स्पर्धेत खेळण्यासाठी मैदानावर उतरलेल्या रोहितला 3 धावाच करता आल्या. जलदगती गोलंदाजांसमोर त्याने सातत्याने पत्करलेली शरणागती इथेही दिसली. जम्मू काश्मीरच्या वेगवान गोलंदाजांनी रोहितलाच नव्हे, तर अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, यशस्वी जैस्वाल या खेळाडूंनाही स्वस्तात बाद केले आहे. परंतु, शार्दूल ठाकूर मैदानावर उभा राहिला आणि अर्धशतक झळकावले.