| पुणे | प्रतिनिधी |
टँकरच्या चाकाखाली सापडून एक वर्षांचा बालकाचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर-सासवड रस्त्यावरील उरूळी देवाची परिसरात घडली आहे. कृष्णा राहुल महतो असे मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी टँकरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत बबीतादेवी राहुल महतो (22), सध्या रा. हडपसर-सासवड यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महातो दाम्पत्य सासवड रस्त्यावरील उरुळी देवाची परिसरातील एका भंगार माल दुकानात कामाला आहेत. दुकानाच्या पोटमाळ्यावर ते राहायला आहेत. मंगळवारी (दि.21) दुपारी तीनच्या सुमारास महातो यांचा एक वर्षांचा मुलगा कृष्णा भंगार माल दुकानाच्या समोरील मोकळ्या जागेत खेळत होता. त्याची आई बबीतादेवी यांनी त्याला चटईवर ठेवले होते. त्यावेळी तेथे आलेल्या पाण्याच्या टँकरच्या चाकाखाली तो सापडला. त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता चालक पसार झाला. सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे अधिक तपास करीत आहेत.