| पुणे | प्रतिनिधी |
कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर शिलाई मशीनच्या कात्रीने वार करुन तिची हत्या केली. बुधवारी (दि.22) पहाटे ही घटना पुण्यातल्या खराडी भागात घडली आहे. पतीने पत्नीची हत्या केली. त्यानंतर या संदर्भातला व्हिडीओही शूट केला आणि पती पोलीस ठाण्यात पोहचला. याप्रकरणी चंदननगर पोलिसंनी पतीला अटक केली. ज्योती शिवदास गिते (28), रा. तुळजाभवानी नगर, खराडी असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी शिवदास तुकाराम गीते (37) याला अटक केली आहे. पुण्यातील खराडीमध्ये हा दुर्दैवी प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवदास गिते मूळचा बीडमधील आहे. तो न्यायालयात टंकलेखक आहे. तुळजाभवानीनगर भागात तो भाडेतत्त्वावर खोली घेऊन राहत होता. गेल्या काही दिवसांपासून गिते दाम्पत्यात कौटुंबिक कारणांवरून वाद व्हायचे. ज्योती आणि तिचा पती शिवदास यांच्यात बुधवारी पहाटेही असेच वाद झाले. त्यानंतर शिवदासने घरातील कात्रीने ज्योतीच्या गळ्यावर वार केले. प्रॉपर्टी हडप करण्याच्या संशयातून त्याने त्याच्या बायकोलाच संपवलं.आणि हे सगळं केल्यानंतर तो आरोपी पती स्वत:च पोलीस स्टेशनला गेला आणि त्याने हत्येची कबुली दिली. शिवदासने केलेल्या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली आणि तिचा मृत्यू झाला. पुण्यातील चंदननगर पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.