। नवीन पनवेल । वार्ताहर ।
तीस वर्षीय तरुणाच्या खिशातील पैसे जबरदस्तीने काढून घेऊन दगडाने आणि लाथाबुक्याने मारहाण केल्याप्रकरणी तिघां विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसौर अन्सारी हा तक्का कॉलनी येथे राहत असून समाधान जनरल स्टोअर येथून पाण्याची बाटली घेऊन परत येत होता. त्यावेळी पाठीमागून आलेल्या अनोळखी व्यक्तीने त्याच्या खिशातून 1,200 रुपये काढून घेतले. त्यावेळी अक्षय चव्हाण त्याला दिसून आला. पैसे का काढले, असे विचारले असता त्याने धक्का दिला. त्यावेळी विकी याने शिवीगाळ केली आणि हाताने मारण्यास सुरुवात केली. त्यानंतर दादू याने अन्सारी याला पकडून ठेवले आणि तिघांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आणि विकीने दगड उचलून डोक्यात मारला. यात अन्सारी हा जखमी झाला आहे.