| म्हसळा | वार्ताहर |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत येत्या (दि.7) मे रोजी होणार्या मतदाननिमित्त 193 श्रीवर्धन मतदार केंद्रस्तरीय अधिकारी आणि कर्मचारी यांचे पहिले प्रशिक्षण माणगाव येथील ज.गांधी मेमोरीयल हॉल येथे (दि. 8) एप्रिल रोजी संपन्न झाले. त्याचप्रमाणे तसेच ईव्हीएम व्हीव्हीपॅट यंत्र हाताळणे बाबत प्रशिक्षण अशोक दादा साबळे विद्यालयामध्ये संपन्न झाले. अप्पर जिल्हाधिकारी ज्योत्स्ना पडियार यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या प्रशिक्षणासाठी उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीवर्धन महेश पाटील, श्रीवर्धन तहसीलदार महेंद्र वाकलेकर, म्हसळा तहसीलदार समीर घारे, माणगाव तहसीलदार विकास गारुडकर, तळा तहसीलदार श्रीम. स्वाती पाटील आदि अधिकारी उपस्थित होते.
सर्व कर्मचारी यांना आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये कर्तव्य पार पाडण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण माणगाव तहसीलदार विकास गारुडकर यांनी दिले. निवडणुकीच्या काळात प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांची महत्वाची भूमिका असतें असे म्हसळा तहसीलदार समीर घारे यांनी सांगून प्रत्येक कर्मचार्याने भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनांचे काटेकोर पालन अत्यावश्यक असल्याचे सांगितले. पहिल्या सत्रामध्ये मतदान अधिकारी आणि मतदान अधिकारी 1 यांचे प्रशिक्षण व ईव्हीएम व्हीव्हीपॅट यंत्र चाळविणे या बाबत सविस्तर माहिती देण्यात आली. दुसर्या सत्रात इतर मतदान कर्मचार्यांना प्रशिक्षण व ईव्हीएम व्हीव्हीपॅट हाताळणे बाबत प्रशिक्षण देण्यात आले. मतदानाच्या दिवशी सुरळीतपणे मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी विविध मुद्यानबाबत अप्पर जिल्हाधिकारी ज्योत्सना पडियार यांनी सूचना दिल्या.