अवैध मासेमारीची पाहणी करणाऱ्या मत्स्य अधिकार्‍याला मारहाण

। उरण । वार्ताहर ।
उरण करंजा येथे अवैध मासेमारीची पाहणी करण्यास गेलेल्या मत्स्यविकास परवाना अधिकार्‍याला व त्याच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. याबाबत उरण पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून मत्स्य प्रजनन कालावधीमध्ये शासनाकडून पावसाळी मासेमारी बंद करण्यात आली आहे. मात्र करंजा येथे होत असणार्‍या अवैध मासेमारीची कुणकुण लागल्यानंतर मत्स्य विकास परवाना अधिकारी सुरेश बाबुलगावे यांनी प्रत्यक्ष करंजा जेट्टी येथे जाऊन पाहणी केली असता अवैधरित्या मासेमारी करणारी बोट पकडून बोटीची पाहणी करत असताना बोटीवरील नाखवा तसेच खलाशांनी सुरक्षारक्षक आणि परवाना अधिकारी यांना धक्काबुक्की करत मारहाण केली.

अवैध मासेमारी रोखण्यासाठी पोलीस संरक्षण न मिळाल्याने हा प्रकार घडला असून, हे घडल्यानंतरही पोलीस यंत्रणांकडून योग्य सहकार्य होत नाही. मत्स्य अधिकारी

सुरेश बाबुलगावे,
Exit mobile version