अलिबाग मध्ये मच्छीमाराचा बुडून मृत्यू

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
खुबे काढण्यासाठी कुलाबा किल्ल्याच्या कातळावर गेलेल्या ३८ वर्षीय मच्छीमाराचा भरतीच्या पाण्यात बुडून मृत्यु झाला. अलिबाग समुद्र किनाऱ्यावर त्याचा मृतदेह आढळला.

दिनेश हरी राक्षिकर वय ३८ राहणार कस्टम बंदर, कोळीवाडा अलिबाग असे या इसमाचे नाव आहे. सदर इसम आज बुधवारी दुपारच्या सुमारास समुद्राच्या पाण्याला ओहोटी आल्याने कुलाबा किल्ल्याच्या कातळावर खूबे काढण्यासाठी गेला होता. खुबे काढून तो घरी परतत असताना समुद्राच्या पाण्याला भरती येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहात सापडून तो बुडाला. सायंकाळी ५.४४ च्या सुमारास त्याचा मृतदेह जनरल अरुणकुमार वैद्य हायस्कूल च्या मागील भागातील किनाऱ्यावर आढलून आला. याबाबतची नोंद अलिबाग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version