गणेशोत्सवासाठी मासेमारी नौका बंदरात दाखल

| मुरूड-जंजिरा | वार्ताहर |

गणेशोत्सवासाठी मुरूड जंजिरा परिसर सज्ज झाला असून मुंबई पुण्यातील चाकरमानी देखील मोठ्या संख्येने आले आहेत. मुंबईला मासेमारी करणाऱ्या दालदी मोठ्या सुमारे 600 यांत्रिक नौका गणेशोत्सवासाठी मुरूड, एकदरा, राजपुरी, नांदगाव, बोर्ली आदी खाडीत दाखल झाल्या आहेत, अशी माहिती एकदरा येथील नाखवा रोहन निशानदार यांनी दिली.

तालुक्यातील घरोघरीचा गणेशोत्सव प्रसिद्ध असून खासगी ठिकाणी सुमारे सात हजार घरांतून गणेशोत्सव साजरा होत आहे. तालुक्यात एकही ठिकाणी सार्वजनीक गणेशोत्सव साजरा केला जात नाही. गणेशोत्सवासाठी मुरूडची मुख्य बाजारपेठ सजली असून खरेदीसाठी मोठी गर्दी उसळल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांना एकमार्गी वाहतूक करावी लागली आहे. मुरूड कोळीवाडा, एकदरा गाव, राजपुरी, नांदगाव, बोर्ली, कोर्लई आदी कोळीवाड्यातुन गणेशोत्सवाची धूम पाहण्याजोगी असते. या गावांतून चैतन्याचे वातावरण दिसून येत आहे.

Exit mobile version