| रायगड | प्रतिनिधी |
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाच्या इशाऱ्यामुळे रायगड जिल्ह्यातील खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या सुमारे 3 हजार बोटी समुद्रकिनाऱ्यावर परत आल्या आहेत. जिल्ह्यात एकूण 3,500 मासेमारी बोटी नोंदणीकृत असून, यापैकी बहुतेक बोटी सध्या किनाऱ्यावर परतल्या आहेत. उर्वरित बोटींच्या सुरक्षित परतीसाठीही प्रशासन आणि बंदर विभाग सतत संपर्कात आहेत. चक्रीवादळाचा इशारा मिळताच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क झाली असून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, स्थानिक ग्रामपंचायती, सागरी सुरक्षा पथक आणि पोलीस दल यांना देखील सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यावर्षी पावसाळा लवकर सुरू झाल्याने मच्छीमार बांधवांना मासेमारी लवकरच बंद करावी लागली. त्यानंतरही अनेकदा वादळामुळे खोल समुद्रातील मासेमारी ठप्प होती. यामुळे मच्छीमार बांधवांचा हंगाम वाया गेला असून, ते आर्थिक संकटात सापडले आहेत. ताजी मासळी नसल्याने खवय्यांचे वांधेगेले काही दिवस खोल समुद्रातील मासेमारी बंद झाल्याने मच्छीमार बांधवांनी आपल्या बोटी किनाऱ्याला लावल्या आहेत. त्यामुळे ताजी मासळी बाजारातून गायब झाली आहे. यामुळे खवय्ये व पर्यटकांचे वांदे झाले आहेत.







