मासेमारी विषयक कार्यशाळेचे शिबीर

| आगरदांडा । वार्ताहर ।
जयभवानी मच्छीमार सहकारी संस्था मर्यादित मुरुड-जंजिरा व जी. एम. वेदक कॉलेज ऑफ सायन्स तळा-रायगड आणि भारतीय राष्ट्रीय महासागर सुचना सेवा केंद्र (ईन्काईस), भूविज्ञान मंत्रालय, सरकार, हैद्राबाद यांच्या संयुक्त विद्यमाने सागरी हवामान व संभाव्य मासेमारी क्षेत्र या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. प्रा. डॉ. बी. जी. भवरे यांनी सागरी हवामान अंदाज व संभाव्य मासेमारी क्षेत्र याचा मच्छीमार बांधवांनी कसा उपयोग करून घ्यावा व अत्याधुनिक उपकरणे कशी वापरावीत याबद्दल माहिती दिली.

तसेच ईन्काईस हैद्राबाद नामवंत मत्स्यव्यवसाय संबंधित तज्ज्ञ वेज्ञानिक आशुतोष वर्मा व श्री. शिवाकुमार यांनी संभाव्य मासेमारी क्षेत्र आणि सागरी हवामान अंदाज त्याचबरोबर त्सुनामी, वादळ वारे या विषयावर सादरीकरण केले आहे. या कार्यक्रमासाठी जयहनुमान मच्छीमार सहकारी संस्थेचे चेरमन पांडुरंग आगरकर, जगनाथ वाघरे, नरसिंह मानाजी, यशवंत सवाई, महेंद्र गार्डी, मच्छीमार बांधव उपस्थित होते. आभारप्रदर्शन गार्डी यांनी मानले.

Exit mobile version