माथेरान घाटात दरड कोसळू लागल्या

| कर्जत | प्रतिनिधी |

माथेरान घाटात दरडी कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत. पावसाळ्यात धबधब्यावर पर्यटक मोठी गर्दी होत आहे. पण परंतु यंत्रणेच्या अक्षम्य अधिकारांच्या अक्षम दुर्लक्षामुळे येथील पर्यटकांची सुरक्षा मात्र राम भरोसे असल्याचेे बोलले जाते. या वर्षी पहिल्याच पावसात दोन ठीकाणी झाडे तर एका ठिकाणी दरड पडली कुठलीही जिवीत किंवा वित्त हानी झाली नसली तरी याबाबत उपाय योजना करणे महत्वाचे आहे. उशिरा का होईना सार्वजनिक बांधकाम खात्याला जाग आली आणि दरडी कोसळत असलेल्या ठिकाणची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाहणी करण्यात आली, याप्रसंगी सातत्याने घाटात संरक्षण जाळी बसवावी अशी मागणी करणाऱ्या माथेरानच्या माजी नगराध्यक्ष प्रेरणा सावंत उपस्थित होत्या.

प्रेरणा सावंत या गेल्या चार वर्षांपासून माथेरान घाटात संरक्षण जाळी बसवावी म्हणून शासन दरबारी पाठपुरावा करत आहेत तर येथील सेवा भावी संस्था, टॅक्सी चालक देखील पाठपुरावा करत आहेत. पण आजपर्यंत पहाणी दौऱ्याशिवाय अधिकाऱ्यांनी कुठली ही उपाय योजना केली नाही, याबाबत टॅक्सी युनियनचे उपाध्यक्ष रवींद्र मिसाळ म्हणाले की सार्वजनिक बांधकाम विभाग मृत्यू होण्याची वाट पाहात आहे का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पहाणी केल्यावर ह्या ठिकाणी जाळी बसवली जाईल असे सांगण्यात आले पण सुटलेल्या दगडावर जाळी बसवली तर तो दगड जाळी घेऊनच खाली येऊ शकतो म्हणजे रोगा पेक्षा ईलाज भंयकर त्या पेक्षा दगडाचा काही भाग काढून तेथे संरक्षण भिंत बांधली तर ते अधिक उत्तम होऊ शकतं असं जाणकारांच म्हणनं आहे, अजून पाऊस अर्धा पडला अजून बाकी दरम्यानच्या काळात एखादी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांन कडून विचारला जात आहे, या सगळ्या गोष्टीकडे रायगड जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे

Exit mobile version