पेण येथील घरफोडीत साडेपाच लाखांचे दागिने चोरीला

। अलिबाग । वार्ताहर ।
पेण मध्ये चोर्‍यांचे प्रमाण वाढीस लागले असून तरणखोप येथे झालेल्या घरफोडीत तब्बल साडेपाच लाखांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना घडली. पेण मधील तरणखोप गावातील फिर्यादी, रा.तरणखोप यांच्या घरात घरफोडी करून तब्बल 5 लाख साठ हजार पाचशे नव्वद रुपये किंमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एैवज कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेला. याबाबत पेण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version