| रायगड | वार्ताहर |
पेण पोलीस ठाणे हद्दीत काश्मीरे येथे एका राहत्या घरात जबरी चोरीची घटना घडली आहे. चोरट्यांनी बाथरुमच्या खिडकीतून घरात प्रवेश करत कपाटाली तब्बल सहा लाख 87 हजार रुपयांच्या दागिण्यावर हात साफ केला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. चोरांनी चोरी केल्यानंतर घराला आतल्या बाजूने कडी लावून पोबारा केला. याबाबत पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.