। रसायनी । वार्ताहर ।
कराडे बुद्रुक गावाजवळील अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात बी. जी. एंटरप्राईजेस नावाची कंपनी असून याच कंपनीतील सुरक्षारक्षकांनी जवळपास 15 लाख 25 हजार रुपये किंमतीचे साहित्य व मशिनरीचे पार्टस चोरून नेल्याचे उघडकीस आले असून तीन सुरक्षारक्षकांपैकी दोन जणांना रसायनी पोलिसांनी अटक केली आहे.
एक्सलंट गार्ड फोर्सच्या तिघा सुरक्षारक्षकांनी आपल्या पदाचा गैरवापर करत तिघांनी संगनमत करून बी. जी. एंटरप्राईजेस कंपनीमध्ये पिडीलाइट इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचे ठेवण्यात आलेले 15 लाख 25 हजार रुपये किमतीचे साहित्य व मशनरी पार्टस् स्वतःचा फायद्याकरिता लबाडीच्या इराद्याने चोरी करून नेले म्हणून रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रसायनी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून दोघांना अटक केली आहे.यसदर प्रकरणी मोहम्मद शफीक मोहम्मद रफी, मोहम्मद युनीस अब्दुल करीम शेख दोन्ही रा. गोवंडी मुंबई यांना अटक करण्यात आली आहे. तर राजेशकुमार झा व इतर तीन फरार आहेत. रायगड पालिसांना चोरीचा तपास लावण्यात यश आले आहे.