। नेरळ। प्रतिनिधी ।
कर्जत पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत अनेक गुन्हे वाहनांच्या बाबत दाखल झाले आहेत. त्यात अपघाती वाहने आणि चोरीला गेलेली वाहने यांच्या बाबतीतील गुन्हे आहेत. त्या गुन्ह्यातील वाहनांचा खच कर्जत पोलीस ठाणे परिसरात झाला आहे. त्यामुळे त्या बेवारस म्हणून पडलेल्या वाहनांच्या मालकांनी आपल्या वाहनांची खात्री पटवून घेण्यासाठी कर्जत पोलीस ठाण्यात यावे असे आवाहन कर्जत पोलीस ठाण्याच्यावतीने करण्यात आले आहे. दरम्यान, 16 दुचाकी, दोन रिक्षा आणि चार चारचाकी वाहने यांचा समावेश असून संबंधितांनी कर्जत पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा आणि आवश्यक कागदपत्रांसह आपल्या वाहनांची पडताळणी करून ती ताब्यात घ्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी केले आहे.
कर्जत पोलीस ठाणे परिसरात अनेक बेवारस वाहने ही अनेक वर्षे पडून आहेत. त्या बेवारस वाहनांमुळे पोलीस ठाण्याच्या परिसरात अस्वच्छता दिसून येते. त्यामुळे कर्जत पोलीस ठाणे येथे बेवारस म्हणून अनेक वर्षे पडून असलेल्या वाहनांची यादी जाहीर स्वरूपात प्रसिद्ध केली आहे. जेणेकरून त्या त्या वाहनांचे मालक यांनी सदर वाहने आवश्यक कागदपत्रे सोबत आणून खात्री करून घेऊन जावीत असा कर्जत पोलीस ठाण्याचा उद्देश आहे. त्या उद्देशाने कर्जत पोलिसांनी आपल्या पोलीस ठाणे हद्दीमधील बेवारस वाहने यांची यादी प्रसिद्ध केली आहेत. त्या त्या वाहनं चालकांबद्दल कोणीही पुढे आले नाही, तर कदाचीत ती वाहने भंगारात काढली जाण्याची शक्यता आहे.
कर्जत पोलीस ठाणे येथे बेवारस पडलेल्या वाहनांमध्ये एमएच 06 823 होंडा कंपनीची पेंशन मोटारसायकल, एमएच 5050 बुलेट मोटारसायकल, एमएच 46 8381 होंडा शाईन, एमएच 05 2744 होंडा कंपनीची मोटारसायकल, एमएच 665 होंडा कंपनीची मोटारसायकल, एमएच 1198 बजाज डिस्कव्हर मोटारसायकल, एमएच06 5905 निळसर रंगाची स्कूटी, एमएच 46 1403 होंडा ड्रीम युगा (ग्रे रंग), टिव्हीएस अपाचे 160 (टाकी व सिट नसलेली, नंबर प्लेट नाही), होंडा शाईन (चेसिस नंबर गंजलेला), हिरो होंडा स्प्लेंडर (नंबर प्लेट नाही), हिरो होंडा डॉन (नंबर प्लेट नाही),13. हिरो डिलक्स (लाल-काळ्या रंगाची, नंबर प्लेट नाही), होंडा डिओ स्कूटी (काळ्या रंगाची, नंबर प्लेट नाही) अशी वाहने आहेत. तर तीन चाकी रिक्षा यामध्ये जगदंब लिहिलेली रिक्षा (नंबर प्लेट नाही), एमएच 05 361 (फेक नंबर) बजाज कंपनीची काळ्या-पिवळ्या रंगाची रिक्षा यांचा समावेश आहे. तर चारचाकी वाहने मध्ये एमएच 49 3222 बोलेरो पिकअप टेम्पो, एमएच 46 0562 टाटा सुमो, होंडा सिल्वर रंगाची गाडी, ट्रॅक्टर व ट्रॉली (मॉडेल: 45, सिरीयल नंबर: 2158904) या वाहनांचा समावेश आहे.
अन्यथा लिलाव होणार
या वाहनांचे मूळ मालकांनी लवकरात लवकर पोलीस ठाण्यात येऊन आपल्या वाहनांची पडताळणी करून ती ताब्यात घ्यावीत. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे व ओळखपत्र घेऊन पोलीस ठाण्यात हजर राहावे.जर वाहनमालकांनी पुढाकार घेतला नाही, तर न्यायालयीन आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कायदेशीर प्रक्रियेनंतर या वाहनांचा लिलाव किंवा स्क्रॅप म्हणून विल्हेवाट लावली जाईल असे अशी देणारे आवाहन पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी दिले आहे.