इमारतीची लिफ्ट कोसळून पाच जण जखमी

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

। मुंबई । प्रतिनिधी ।

मुंबईतील भायखळा पूर्व येथील जयकृपा टॉवरमध्ये बुधवारी (दि.11) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एक दुर्घटना घडली. या 18 मजली इमारतीची लिफ्ट कोसळली असून यात पाच जण जखमी झाले आहेत. या इमारतीच्या लिफ्टच्या केबलमध्ये बिघाड झाली होती. त्यामुळे चौथ्या मजल्यावरून ती वेगाने खाली कोसळली. यावेळी लिफ्टमध्ये पाच रहिवासी होते, या सर्व रहिवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि रुग्णवाहिका हे घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केलं. जखमींपैकी तिघांना जे जे रुग्णालयात, एकाला बालाजी रुग्णालयात आणि आणखी एकाला जसलोक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. या घटनेनंतर लिफ्टच्या सुरक्षेचा आणि देखभालीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याप्रकरणी लिफ्टची देखभाल, नियमित सुरक्षा तपासणी आणि परवानग्या यांच्याशी संबंधित कागदपत्रे पोलिसांकडून तपासली जाणार आहेत. नेमकी जबाबदारी कोणाची आहे, याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे. या तपासाअंती पुढील कारवाई केली जाणार आहे.

Exit mobile version