| मुंबई | प्रतिनिधी ।
गणेशोत्सवाच्या तयारीदरम्यान भुलेश्वर परिसरात शनिवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. सुमारे 22 फूट उंच ‘भुलेश्वरचा राजा’ गणपतीची मूर्ती मंडपात नेत असताना अचानक कोसळली. मूर्ती अंगावर पडल्याने दोघांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. जय आंबे चौकात रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जखमींमध्ये 5 आणि 7 वर्षांच्या दोन मुलींचाही समावेश असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस, रुग्णवाहिका आणि महापालिकेची पथके घटनास्थळी दाखल झाली.







