भुशी डॅम धबधब्यातून पाच जण बेपत्ता; शोध कार्य सुरु

| पुणे | प्रतिनिधी |

वर्षाविहारासाठी लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरात पर्यटनासाठी आलेल्या एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची घटना घडली आहे. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील भुशी डॅम धबधब्यातून अन्सारी कुटुंब वाहून गेले असून ग्रामस्थ, वन्यजीव रक्षक, पोलिसांच्या मदतीने शोधमोहीम सुरू आहे. मात्र, त्याचा अद्याप शोध लागला नाही.

भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील धबधब्याला रेल्वेचा वॉटर फॉल म्हणून ओळखले जाते.अन्सारी कुटुंब रविवारी परिवारासोबत वर्षाविहारासाठी या परिसरात आले होते. पाण्याच्या प्रवाहात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी कुटुंब गेले असता, येथील पाण्याला वेग आल्याने वाहून गेले. यावेळी ऐकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. धबधब्यातील पाण्याचा प्रवाह भुशी डॅम धरणात येते, तिथे पाच जणांचे शोधकार्य सुरू आहे. यात लहान मुलांचा आणि महिलांचा समावेश आहे.

Exit mobile version