पनवेल परिसरात खळबळ
| पनवेल | वार्ताहर |
पनवेल शहरातील नवाब चाळ, पाण्याच्या टाकीजवळ पटेल मोहल्ला येथे राहणार्या पटेल कुटुंबातील पाचजण लग्नाला जातो असे सांगून घराबाहेर पडले ते अद्याप घरी न परतल्याने ते हरवल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.
मोहम्मद अझर अब्दुल्ला पटेल (वय 48) उंची पाच फूट ,रंग सावळा ,केस सफेद काळे , नाक सरळ ,चेहरा उभट , दाढी थोडी वाढलेली असून अंगात काळी पँट व लाईट कलरचा शर्ट घातला आहे . शबीना अझर पटेल (वय 37) , उंची 4.05 फूट ,रंग सावळा ,केस काळे ,नाक सरळ , चेहरा उभट असून , अंगात सोनेरी रंगाचा पंजाबी ड्रेस घातला आहे . अथर अंझर पटेल (वय – 18) , उची पाच फुट, रग सावळा, केस काळे, नाक सरळ, चेहरा उभट, अंगात नेसुन शर्ट पॅन्ट घातला आहे. अरफा अंझर पटेल (वय – 15) , उंची चार फुट पाच इंच, रंग गोरा, केस काळे, नाक बसके, जाडसर चेहर उभट, अंगात नेसुन पंजाबी ड्रेस रंग माहीत नाही . अझर अंझर पटेल, (वय 12 ), उंची चार फुट, रंग गोरा, केस काळे, नाक सरळ अंगाने सडपातळ, चेहरा उभट, अंगात नेसुन जिन्स पॅन्ट व शर्ट रंग माहीत नाही. हे बेपत्ता झाले असून यामध्ये कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे फोन नंबर – 022-27452333 किंवा पोहवा एन . आर. वाघमारे यांच्या शी संपर्क साधावा.