| नागपूर | प्रतिनिधी |
नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्याती सुरगाव शिवार इथं धक्कादायक घटना घडली आहे. जुन्या खाणीतील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच नागपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बचाव पथकाच्या मदतीने नागपूर पोलिसांनी मृतदेह बाहेर काढले. मृतांमध्ये एक पुरुष दोन महिला आणि दोन किशोरवयीन बालकांचा समावेश आहे. एहतेशाम अन्सारी, (26), रोशनी चौधरी (32), अंजली चौधरी (25), मोहित चौधरी (10), लक्ष्मी चौधरी (8) अशी पाण्यात बुडून मृत्यू झालेल्याची नावे आहेत. पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून 5 जणांचा एकाच वेळी मृत्यू झाल्यानं ही दुर्घटना आहे की आत्महत्या असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
खदाणीमध्ये बुडून पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू
