| अलिबाग | प्रतिनिधी |
ख्रिश्चन मिशनरीच्या नावाने घराघरात घुसणाऱ्या पाचजणांना अलिबाग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना गुरुवारी (दि.1) दुपारी चेंढरे व अलिबाग परिसरात घडली आहे. त्यामध्ये तीन पुरुष व दोन महिलांचा समावेश असल्याची माहिती अलिबाग पोलीसांनी दिली.
अलिबाग शहरात व चेंढरे परिसरात काही मंडळी नागरिकांच्या घरात घुसून तुम्ही हिंदू आहात का, तुम्ही ख्रिश्चन आहात का, असा सवाल उपस्थित करीत होते. त्यांची संशयीत हालचाल तेथील स्थानिक पुष्पराज राऊळ, निखील चव्हाण यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी सतर्कता दाखवत त्या पाचही जणांना अलिबाग पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेने धर्मांतर करणाऱ्या काही संशयित टोळींनी डोकेवर काढण्याचा प्रकार समोर आला आहे.