। पनवेल । प्रतिनिधी ।
खारघर वसाहतीमध्ये एकाच रात्री पाच दुकाने फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. या चोरीच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
खारघर वसाहतीमध्ये राज टॉवर येथे असलेल्या ग्लोबल सिरॅमिक, रामदेव स्वीट अँड फरसाण मार्ट, देवराज प्लायवूड, मेडिकल स्टोर व डेंटल क्लिनिकचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून लाखो रुपये किमतीचा मुद्देमाल व रोख रक्कम लंपास केली. हा चोरीचा प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या चोरीच्या घटनांमुळे सणासुदीच्या काळात व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.







