पाच टन ड्रग्ज जप्त

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारतीय तटरक्षक दलाने सोमवारी (दि.25) अंदमान आणि निकोबार बेटांजवळ बंगालच्या उपसागरात पाच टन ड्रग्ज घेऊन जाणारी बोट पकडली आहे. या बोटीचा वापर मासेमारीसाठी करण्यात येत होता. मात्र, यामधून इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. भारतीय तटरक्षक दलाने आतापर्यंत अंमली पदार्थाविरोधात केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. तसेच इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स सापडण्याचीदेखील ही पहिलीच वेळ असल्याची माहिती तटरक्षक दलाच्या अधिकार्‍यांनी दिली.

Exit mobile version