श्वास कोंडून पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू

। मुंबई । प्रतिनिधी ।

मुंबईतील मुलुंड परिसरात गुरुवारी एक धक्कादायक घटना घडली. गॅरेजमधील कारमध्ये खेळाताना श्वास कोंडल्याने एका पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला.

मुलुंडच्या आंबेडकरनगर परिसरात राहणाऱ्या कबीर कनोजिया (5) याच्या वडिलांची म्हाडा वसाहत परिसरात पान टपरी आहे. त्याच्या बाजूलाच एक मोटार गॅरेज आहे. कबीर रोज त्याच्या वडिलांना भेटायला जात असे. गुरुवारी (दि. 07) दुपारी तीनच्या सुमारास नेहमीप्रमाणे तो वडिलांना भेटायला गेला होता. त्यानंतर तो बाजूच्या गॅरेजमधील काही मोटारगाड्यांमध्ये खेळत होता. खूप वेळ झाला म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला शोधण्याचा प्रयन्त केला. मात्र तो कुठे दिसला नाही. अखेर सायंकाळी पाचच्या सुमारास एका मोटारगाडीत कबीर बेशुद्ध अवस्थेत एका व्यक्तीला दिसला. याबाबत त्याच्या वडिलांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मुलाला बाहेर काढले. त्यानंतर मुलाला तात्काळ मुलुंडच्या अगरवाल रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

Exit mobile version