| बोर्लीपंचतन | वार्ताहर |
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या श्रीवर्धन येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात निवृत्त रडार ऑपरेटर भारतीय वायुदल प्रकाश प्रधान यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. याप्रसंगी 1965 आणि 1971 चे युद्धाच्या वेळेचे थरारक प्रसंग यांनी विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाने अनेक मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. न्यू इंग्लिश स्कूल, आराठी येथील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी या उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन प्रा. नवज्योत जावळेकर यांनी केले.