पीएनपी संकुलात ध्वजारोहण

| अलिबाग | प्रतिनिधी |

पीएनपी वेश्वी संकुलात बी.एड. कॉलेजचे प्राचार्य नितेश मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण त्यागलेल्या हुतात्म्यांना व स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या सैन्यदलातील शूरवीरांचे स्मरण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले आणि देशभक्तीपर गीतांवर विद्यार्थ्यांनी नृत्याविष्काराचे सादरीकरण केले.


याप्रसंगी कॉलेजचे प्र. प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, पीएनपी कॉलेजचे संचालक विक्रांत वार्डे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. रवींद्र पाटील, होली चाईल्ड स्कूलच्या मुख्याध्यापिका वेल्लईम्मल्ल, होली चाईल्ड स्टेट बोर्डच्या मुख्याध्यापिका निसर्गा चेवले, ॲकॅडमिक डायरेक्टर श्रुती सुतार, जनसंपर्क अधिकारी अमोल नाईक, उपमुख्याध्यापिका सदाफ शाहबाजकर, शर्मिला शेट्ये इतर मान्यवर, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version