अलिबाग । प्रतिनिधी ।
भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त पीएनपी संकूल वेश्वी ,अलिबाग येथे पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कॉलेजचे प्राचार्या मिशेल फिलिप्स, बीएड कॉलेजचे प्राचार्य नितेश मोरे, शाळेचे मुख्याध्यापक निलेश मगर, होली चाईल्डचे प्राचार्य संजय मिर्जी, प्रा. नम्रता पाटील, प्रा. ऋतुषा पाटील इतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते.