गुडघाभर पाण्यात उभे करून ध्वजारोहण!

धाकटे शहापूर शाळेची संतापजनक अवस्था

| अलिबाग | प्रतिनिधी |

स्वातंत्र्यदिनी देशभरात अभिमानाने तिरंगा फडकवला जात असताना, अलिबाग तालुक्यातील धाकटे शहापूर येथील रायगड जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गुडघाभर पाण्यात उभे राहून ध्वजारोहण करावे लागले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

शाळेच्या परिसरात पावसाचे पाणी साचत असल्याने राष्ट्रीय सणांच्या दिवशी विद्यार्थ्यांना चिखल आणि पाण्यातून वाट काढत ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे लागत आहे. राष्ट्रीय सणाच्या दिवशी विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि स्वच्छ परिसर उपलब्ध करून देणे अपेक्षित असताना, त्यांनाच गुडघाभर पाण्यात उभे राहण्याची वेळ येत असल्याने शिक्षण विभागाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शाळेच्या परिसरातील पाण्याचा निचरा करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करून विद्यार्थ्यांना या समस्येतून तातडीने मुक्त करावे, अशी मागणी ग्रामस्थ आणि पालकांकडून होत आहे.

तसेच, विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासनाची असताना, राष्ट्रीय सणाच्या दिवशीच विद्यार्थ्यांना गुडघाभर पाण्यात उभे राहण्याची वेळ येणे ही प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

Exit mobile version