महाडची दैनावस्था; चवदार तळ्यात कचरा…पहा व्हिडिओ
। पोलादपूर/ महाड/ गोवे कोलाड/ प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील महाड, गोवे, कोलाड, कर्जत आदी परिसरात पावसाने हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून गावांचा संपर्कही तुटला आहे. महाड तालुक्यातील अनेक रस्ते, घरे पाण्याखाली गेली आहे. नद्यांनी रौद्ररुप धारण केले आहे. परिणामी मुंबई-गोवा महामार्गही बंद करण्यात आला आहे. कर्जत तालुक्यातीही हीच परिस्थिती आहे. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. परिणामी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पुराचा आढावा घेण्यासाठी महाड, गोवे, कोलाड आदि ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
संपूर्ण रायगडसह कोलाड विभागात बुधवार सकाळपासून सुरू झालेल्या वादळी, मुसळधार पावसाने झोडपले असून गोवे येथे पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने रायगडाच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी गोवे येथे पाण्याची पाहाणी केली. कुंडलिका
नदीची पातळी वाढली तर गोवे येथील नदीला खांड (भगदाड) पडल्याने व त्यातच नदी प्रवाह पलटी झाल्याने पुराचे पाणी काहींच्या घराच्या जवळ तसेच अंतर्गत रस्त्यावर आले होते.