| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
गेल्या तीन ते चार दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पनवेलच्या गाढी नदीला मोठा पूर आला आहे. चिपळे येथील पुलाखालून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. गाढी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आलेले दिसत आहे. तसेच नांदगाव येथील पुलावरून पाणी गेले आहे.
गेल्या तीन ते चार दिवसांपासून पनवेल परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. एकूण पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. पनवेल परिसरातील गाढी नदी दुथडी भरून वाहत आहे. शक्य असल्यास नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात येत आहे. गाढी नदीला महापूर आल्याने चिपळे येथील नदीला महापूर आला आहे. माथेरानच्या डोंगरालगत जास्त पाऊस पडत असल्याने ते पाणी गाढेश्वर धरणात येते आणि धरणातून ते पाणी गाढी नदीतून थेट खाडीला जाऊन मिळते. हीच गाढी नदी गेल्या काही तासांपासून दुधडी भरून वाहत आहे. मुसळधार पाऊस कोसळत असल्याने नद्यांना पूर आलेला आहे. प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा दिलेला नसला तरी देखील नागरिकांनी काम नसेल तर घराबाहेर पडू नये.
नांदगाव येथील रस्ता कर्नावती नदीवरील पूल हा पाण्या खाली गेला आहे. सतत पाडणाऱ्या पावसामुळे दोन दिवस हा रस्ता येण्या जाण्या साठी बंद आहे. गेले दहा वर्ष पंचायत समिती पनवेल आणि रायगड जिल्ह्य परिषद कडे नवीन पूलाची मागणी केली आहे. मात्र या कडे दुर्लक्ष केलं जात आहे. प्रशासन बहुदा जीवित हानी होण्याची वाट पाहत असावा असा आरोप नागरिक करत आहेत. कित्येक वेळा पाण्याचा अंदाज न आल्याने या पुलावर गाड्या अडकतात दर वर्षी प्रमाणे नांदगाव नागरिकांना पर्यायी लांबचा मार्ग वापरावा लागतो.







