सचिन धुमाळची बासरीवादनाची कार्यशाळा

| अलिबाग | वार्ताहर |

अलिबाग तालुक्यातील धामणपाडा गावातील बासरीवादक सचिन धुमाळ यांच्या बासरीवादनाच्या प्रशिक्षणाची कार्यशाळा नुकतीच अलिबाग तालुक्यातील विविध शाळांमध्ये संपन्न झाली. जिल्ह्यात अध्यात्मिक क्षेत्रामध्ये भजनासह, पारंपरिक गाणी आणि पारंपरिक वाद्यांना महत्त्व आहे. पण आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये बासरी या वाद्याबद्दल जागृती व्हावी, त्यांना या वाद्याची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने त्यांनी तीनवीरा, हाशिवरे, चोंढी, राजिप शाळा पेझारी, माध्यमिक शाळा शिहू, रिलायन्स फाउंडेशन स्कुल नागोठणे या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना विनामूल्य बासरीवादनाचे प्रशिक्षण दिले. या कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी जवळजवळ 900 विद्यार्थ्यांना बासरी या वाद्याची माहिती देऊन आपल्या शिष्यांसह बासरीवादन ऐकवले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन धुमाळ म्युझिक कॅडमीच्या सर्व शिष्यांनी तसेच विविध शाळांमधील शिक्षक वृंदाने परिश्रम घेतले.

Exit mobile version