रसायनीत अन्नदान सुरु

| रसायनी | प्रतिनिधी |

श्री साईबाबा मंदिर मोहोपाडा रसायनी येथे अन्नदान पुन्हा सुरू झाले आहे. गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे श्री साईबाबा मंदिर एच ओसी कॉलनी येथील अन्नदान बंद होते, ते गुरुवार (दि.4) मे पासून सुरू करण्यात आले. दुपारी 12 वाजता श्री साईबाबांची आरती करुन अन्नदान मान्यवरांच्या हस्ते सुरू झाले. यावेळी उमा मुंढे, दिनेश कोठाडिया, सुवर्ण आण्णा यादव, यांच्याहस्ते गोरगरिबांना अन्नदान सुरू केले. यासाठी फोन नं अध्यक्ष 9960940244, उपाध्यक्ष फोन. 9850757121 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version