उसर शाळेत खाद्य महोत्सव

| अलिबाग | प्रतिनिधी |

विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच दैनंदिन वस्तू, खाद्य पदार्थ खरेदी विक्रीचे ज्ञान मिळावे यासाठी उसर येथील अलिबाग तालुका शिक्षण प्रसाकर मंडळ प्राथमिक शाळेत खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला शाळेतील विद्यार्थ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. पालकांनीदेखील उपस्थित राहून या उपक्रमात सहभाग घेत खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतला.

शाळेतील विद्यार्थ्यांना व्यवहारीक व व्यवसायिक ज्ञान मिळावे यासाठी शाळेतील शिक्षक शिवाजी दराडे, आशा वानखेडे, मनीषा धसाडे यांच्या संकल्पनेतून शाळेच्या आवारात शनिवारी खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वेगवेगळ्या खाद्य पदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले होते. या स्टॉलमार्फत विद्यार्थी व पालकांनी खाद्य पदार्थांची खरेदी करीत आनंद लुटला. अभ्यासाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहार शालेय स्तरापासून समजावा, हा म्हणून हा उपक्रम शाळेमध्येे घेण्यात आला. या उपक्रमाला विद्यार्थ्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावेळी शाळेतील शिक्षकांसह, पालक संजय पाडेकर, विजय पाडेकर आदी पालक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version