| उरण | प्रतिनिधी |
कबुतरांना खाद्यपदार्थ देण्यास न्यायालयाने स्पष्ट मनाई केली असून, त्याचे पालन संपूर्ण राज्यात सुरू झाले आहे. परंतु, उरण नगरपालिका हद्दीतच न्यायालयाच्या आदेशाची उघड उघड पायमल्ली होताना दिसत आहे. विमला तलावाजवळील शतपावली वाटेवर दिवसाढवळ्या कबुतरांना खाद्यपदार्थ टाकले जात आहेत. त्याकडे नगरपालिकेचे प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याचे स्थानिकांकडून बोलले जात आहे.
कबुतरांमुळे श्वसनविकार आणि संसर्गजन्य आजारांना निमंत्रण मिळते, या कारणावर न्यायालयाने नुकताच कडक बंदी हुकूम दिला. मात्र, उरणमध्ये या आदेशाचे उघड उल्लंघन होत असून, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे. जनतेत यामुळे संतापाची लाट उसळली असून, न्यायालयाचा आदेश झुगारून आरोग्यावर संकट ओढवणाऱ्यांवर आणि त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या नगरपालिकेवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
विमला तलावाशेजारी कबुतरांना खाद्यपदार्थ
