मुठे खरेदीसाठी खवय्यांची धडपड

। सुकेळी । वार्ताहर ।

सद्यपरिस्थितीत पावसाने काहीसा होईनात थोड्याफार प्रमाणात तुरळक अशी सुरूवात केली आहे. या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मिळणारे मुठे व खेकडा हे मांसाहारी खाद्य शरीरासाठी अतिशय आरोग्यदायी समजले जाते. शेताच्या बांधावर आणी माळरानावर बिळातून बाहेर येणारे गावरान मुठे खरेदी करुन खाण्यासाठी खवय्ये आतुरलेले दिसुन येत आहेत. त्यामुळे बाजारात मुठे विक्रीसाठी येत असल्यामुळे खवय्यांची मोठी धडपड सुरू असतानाचे चित्र दिसत आहे.

पावसाचे आगमन झाले की अनेक माळरानावर तसेच शेतामध्ये हिरवेगार गवत दिसु लागते. त्यामुळे पावसाळा वगळता अन्य काळामध्ये बिळामध्ये राहणारे मुठे, खेकडे चारा गोळा करण्यासाठी बिळाबाहेर येत असतात. रात्रीच्या वेळेस रिमझिम पावसात हे मुठे आपल्या नांग्यानी गवत तोडुन बिळात नेऊन निवांतपणे खात असतात. रात्रीच्या वेळी पाऊस पडण्यास सुरुवात झाल्यावर मुठे पकडण्यासाठी खवय्ये हातामध्ये गॅसबत्ती, बॅटरी तसेच सोबत मुठे ठेवण्यासाठी सिमेंटची पोती घेऊन रात्रभर माळरान व शेतामध्ये फिरून मुठे पकडतात.

Exit mobile version