तरस जातीच्या प्राण्याच्या पाऊलखुणा

| नवीन पनवेल । वार्ताहर ।

रिटघर येथील आझाद मैदानाजवळ सुजित भगत हा 17 ऑगस्ट रोजी गाई चारण्यास गेला होता. त्याला संशयास्पद एका प्राण्याच्या पाऊलखुणा आढळून आल्या. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. यावर सावधानता म्हणून पोलीस पाटील दीपक पाटील यांनी वन विभागाला पाचारण केले. त्यांनी या पाऊलखुणा पाहिल्या असता त्या बिबट्याच्या नसल्याचे सांगितले. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निस्वास टाकला. पाटील यांनी आजूबाजूला असलेल्या आदिवासी वाड्यांना सतर्क राहण्यास सांगितले होते. तरी देखील नागरिकांनी रात्री-बेरात्री या आवारात फिरताना सतर्क रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version