| रोहा | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील वरसे हद्दीतील भुवनेश्वर येथे 2023 साली जल जीवन मिशन अंतर्गत सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्चाची योजना सुरु होती. परंतु काही तांत्रिक कारणांमुळे वनविभागाच्या परवानगीसाठी अडचण होती. ग्रामस्थांची पाण्यासाठी प्रखर मागणी लक्षात घेऊन व शासकीय अडचणी दुर करुन पिण्याच्या पाण्याची सुविधेसाठी अखेर उप वनसंरक्षक आप्पासाहेब निकत यांनी परवानगी दिली आहे.
भुवनेश्वर येथील जल जिवन मिशन योजनेत काही शासकीय अडचणी होत्या त्यात लगेच लोकसभा निवडणूक लागल्याने आचार संहिता लागू झाल्या होत्या मात्र आता या योजनेला वनविभागाने परवानगी दिली आहे.
उप वनसंरक्षक आप्पासाहेब निकत,
रोहा







