। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
जिल्ह्यातील दापोलीमधील देवके येथे बुरोंडीवळ एका फासात अडलेल्या बिबट्याची सुटका करण्यात वनविभागाला यश आले आहे. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, दीपक सावंत यांच्या फार्म हाऊसकडे जाणार्या अंतर्गत वाटेवर एका फासात हा बिबटा अडकला होता. त्याच्या आरोळीचा आवाज आल्याने दिपक सावंत यांनी तात्काळ वनविभागाला कळवले. यानंतर वनविभाग कर्मचारी आवश्यक ते साहित्य घेऊन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कसबीने बिबट्याला पिंजर्यात कैद केले. या बिबट्याला वैद्यकीय तपासणी नंतर नैसर्गिक अधिवसात सोडण्यात येणार येईल, अशी माहिती वनविभागाचे खेड वनपाल सुरेश उपरे यानी दिली.







