वनाधिकारी बाळकृष्ण गोरनाक सेवानिवृत्त

म्हसळा | वार्ताहर |
रोहा वनविभागातील म्हसळा वनक्षेत्रातील परिमंडळ वनाधिकारी बाळकृष्ण काशिनाथ गोरनाक हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. म्हसळा पंचायत समितीच्या सभापती छाया म्हात्रे यांच्या हस्ते संपन्न झालेल्या या सेवानिवृत्त सत्कार समारंभास उपसभापती संदिप चाचले, वनक्षेत्रापाल एन. डी. पाटील, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष समिर बनकर, सौ. गोरनाक, त्यांचे वडील काशिनाथ गोरनाक, गोरनाक यांचे संपूर्ण कुटुंब, माजी सभापती महादेव पाटील, तालुक्यातील सर्व वनसामित्यांचे अध्यक्ष, सदस्य, ग्रामस्थ रोहा वनविभागातील कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.
भीमराव सूर्यतल आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ईशस्तवन आणि स्वागत गीताने मान्यवरांचे स्वागत केले. वनपाल चव्हाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. 29 मार्च 1982 त्यांनी माणगाव तालुक्यातून आपल्या सेवेची सुरुवात केली. त्यांनी एकूण 39 वर्षे 7 महिने अशी प्रदीर्घ अशी सेवा केली आहे. म्हसळा तालुका हा अत्यंत ग्रामिण, दुर्गम आणि दुर्गम असुनदेखील त्यांनी अनेक अडचनींवर मात करून शासनाचा प्रत्येक उपक्रम तालुक्यातील तळागाळातील लाभार्थी पर्यंत पोचवून प्रत्येक योजना आणि उपक्रम यशस्वी केला.

Exit mobile version