। म्हसळा । वार्ताहर ।
रोहा वक्षेत्रातील म्हसळा वनविभागातील कुडतुडी वनविभाग येथे वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला. रोहा वनविभागाचे उपवनसंरक्षक अप्पासाहेब निकत, सहाय्यक वनसंरक्षक जाधव आणि वनक्षेत्रपाल निलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसळा तालुक्यातील कुडतुडी गौलवाडी येथे वन्यजीव साप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. रायगड जिल्हा परिषद शाळा कुडतुडी गौलवाडी येथील कार्यक्रमात वनपाल चिंचोडे संजय गिरी, लालछोटे, चवले, मुख्याध्यापक खोले, गौलवाडी अध्यक्ष, पोलीस पाटिल, वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष दिवेकर बुवा, अंगणवाडी ताई, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी वनपाल संजय गिरी यांनी वनमहोत्सवाचे महत्व पटवून दिले. संजय गिरी यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या वन्यजीवसंरक्षण आणि वन्यजीव सप्ताह या विषयावर आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना शालोपयोगी साहित्य देऊन विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. शेवटी संजय गिरी यांनी सर्वांचे आभार मानले.