| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुका कृषी विभाग यांच्या माध्यमातून श्रमदानातून वनराई बांधण्याच्या कामाचा उपक्रमाला सुरुवात झाली. वनराई बंधाऱ्यांच्या माध्यमातून जमिनीमधील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी वनराई बंधारे बांधून नाले आणि नद्यांमधून वाहणारे पाणी अडवण्याचा उपक्रम सुरु केला आहे. कोषाण, ता. कर्जत येथे श्रमदानाने वनराई बंधारा बांधण्याचा कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
कर्जत कृषी विभागाच्या वतीने कर्जत तालुक्यात उन्हाळ्यात कोरड्या असलेले नदी आणि नाले याठिकाणी असलेले पाणी अडवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. हे पाणी अडवण्यासाठी कृषी विभाग यांच्याकडून दरवर्षी केला जातो. यावर्षी श्रमदानातून वनराई बंधारे बांधण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ मोहाली येथे कृषी विभागाच्या वतीने करण्यात आला.कृषी विभागाच्या आवाहनानंतर स्थानिक ग्रामस्थ राजेंद्र ठोंबरे यांनी श्रमदानात आपल्या गावातील सहकारी यांच्यासह सहभाग घेतला. कृषी विभागाचे कर्जत तालुका मंडळ कृषी अधिकारी दिनेश कुमार कोळी तसेच सहायक कृषी अधिकारी पंजकाज सोनकांबळे यांनी श्रमदान करणाऱ्या कर्मचारी आणि ग्रामस्थ यांना मार्गदर्शन केले. कर्जत तालुक्यात कृषी विभागाला वनराई बंधारे बांधण्यासाठी मिशन ग्रीन मुंबईचे डॉ. सुभाजीत मुखर्जी आणि लीप इंडिया फाऊंडेशन यांच्याकडून सहकार्य केले जात आहे. सदर वनराई बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग हा भाजीपाला व कडधान्य पिकांसाठी पाण्याचा वापर करण्यात येणार आहे.







