| भंडारा | वृत्तसंस्था |
भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि भाजप नेते डॉ. परिणय फुके यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या अपघातात परिणय फुके सुदैवाने थोडक्यात बचावले आहेत. राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना हा अपघात झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. अशात हा अपघात आहे की घातपात याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.