| कोची । वृत्तसंस्था ।
भारताचे माजी फुटबॉलपटू ओ. चंद्रशेखर मेनन (85 वर्षे) यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. गेले काही महिने चंद्रशेखर विविध आजारांनी ग्रासले होते. कोची येथील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. चंद्रशेखर यांनी 1962च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या भारतीय फुटबॉल संघाचे प्रतिनिधित्व केले होते.चंद्रशेखर यांनी भारतीय संघाचे नेतृत्वपदही भुषवले.1960च्या रोम ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय संघाचे ते सदस्य होते.1958 ते 1966च्या काळात एकूण 25 सामन्यांत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. स्थानिक फुटबॉलमध्ये 1959 ते 1965 या कालावधीत त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.