। कर्जत । प्रतिनिधी ।
कर्जत एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमिक शाळेच्या दीर्घकाळ मुख्याध्यापिका असणार्या कर्जत मधील पहिल्या महिला डॉक्टरेट असणार्या डॉ. विजया दत्तात्रेय पेठे म्हणजेच पेठे टीचर यांचे अल्पशा आजाराने पनवेल येथील सहस्त्रबुद्धे हॉस्पिटल येथे निधन झाले. अनेक मंडळाची सुरुवात त्यांच्या कल्पनेने व पुढाकारानेच कर्जतमध्ये झाली. स्वानंद महिला मंडळाच्या माध्यमातून त्यांनी अनेक महिला पुरोहित घडवले. तसेच लक्ष्मीकांत सार्वजनिक वाचनालय, कर्जत येथील ब्राह्मण सभा, लायन्स क्लब, स्वरश्री संगीत विद्यालय अशा अनेक संस्थांचे अध्यक्षपद त्यानी यशस्वीपणे भुषविले. तसेच अष्टविनायकापैकी एक असणार्या महडच्या गणपती देवस्थानाचे विश्वस्त म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले. त्यांच्या पश्चात मुलगा विवेक, मुलगी वृंदा, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे.