। मुंबई । प्रतिनिधी ।
कबड्डी क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्त्व, ज्याच्या नावाने तीन दशके प्रतिस्पर्धी संघाचा थरकाप उडावयाचा, असे चौफेर चढाई करणारे अष्टपैलू राष्ट्रीय खेळाडू अमर राजाराम पवार हे गतवर्षी आपल्यातून निघून गेले. याची दखल घेत सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्यावतीने शोकसभेचे आयोजन केले आहे. गुरुवारी (दि.23)सकाळी 11 वाजता सेंट्रल रेल्वे माटुंगा वर्कशॉप येथील कल्याण भवन सभागृह, माटुंगा (पश्चिम) येथे होणार्या शोकसभेस जास्तीतजास्त कबड्डी प्रेमी, खेळाडू आणि अमरच्या चाहत्यांनी हजर रहावे. अशी विनंती आयोजकांकडून करण्यात आली आहे.